धुळे : जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी टीबीमुक्त धुळे या संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. आरोग्य विभागातर्फे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, डॉ. महेश मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकणी, डॉ. तरन्नुम पटेल, माता बालसंगोपन अधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सर्व उपस्थितांनी क्षयरोग मुक्त भारत अभियानाची शपथ घेतली. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानातंर्गत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी सर्वांना निक्षय मित्र बनवून क्षय रुग्णांना कोरडा पोषण आहार पुरविण्याचे आवाहन केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हास्तर, तालुकास्तर, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर तसेच सूक्ष्मदर्शक स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच रांगोळीद्वारे टीबीमुक्त धुळे या संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जिल्हा पीपीएम समन्वयक प्रतिभा पाटील यांनी केले. यावेळी क्षयरोग विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तालुकास्तरावर जनजागृती पर रॅली, क्षयरोग विषयक व्याख्यान, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, आशा सभा, माहिती पुस्तिकेचे वाटप, कम्युनिटी मिटींग, रोग निदान शिबिर, पेशंट प्रोव्हायडर मिटींग, प्रश्नमंजूषा स्पर्धा तसेच कोरडा पोषण आहार किट वाटप इत्यादी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी कळविले आहे.