पळासनेर शिवारातून ३७ लाखांचा गांजा, अफू पावडर जप्त 
धुळे

Dhule Crime : पळासनेर शिवारातून ३७ लाखांचा गांजा, अफू पावडर जप्त; तिघांना अटक

शिरपूर तालुका पोलीसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर तालुक्यातील पळसनेर शिवारात राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या हॉटेलमध्ये गांजा आणि अफू पावडरचा मोठा साठा शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने जप्त केला. या कारवाईमध्ये ३७ लाख ४५ हजार ९६५ रुपये किमतीचा व २२४.६९९ कि.ग्रॅ. वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पळासनेर गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला लागून असणाऱ्या हॉटेल, ढाब्यावर भल्ला चारण-भरवाड, लखा चारण-भरवाड हे गांजा व डोडा या अंमली पदार्थाची साठवणूक व विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे दिली. त्यानंतर पोलिस अधिक्षकांनी पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जय बाबारी हॉटेलमधून भला सोडा भरवाड, जय माता दी ढाबा अॅण्ड रेस्टॉरंटमधून गोपाळ रघु भरवाड व रामदेव बाबा हॉटेलमधून लाला गांगु भरवाड (सर्व रा. चारणपाडा, पळासनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांची तपासणी केली असता त्याच्याकडे ३७ लाख ४५ हजार ९६५ रुपये किमताचा गांजाचा चुरा, सुकलेला गांजा, अफुची पावडर (डोडा) व अफूच्या सुकलेल्या बोंडाचे तुकडे असा अमली पदार्थ मिळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT