Pimpalner Fake Foreign Liquor Seized Pudhari
धुळे

Dhule Liquor Seized | पिंपळनेर पोलिसांची बनावट विदेशी दारू तस्करीवर कारवाई; ८.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिकअप वाहनातून रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचा साठा हस्तगत; साक्री तालुक्यातील बसरावळ गावाजवळ छापा

पुढारी वृत्तसेवा

Pimpalner Fake Foreign Liquor Seized

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बसरावळ गावाजवळ बनावट विदेशी दारूची तस्करी करण्याचा प्रकार पिंपळनेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. शेतातील घरासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की नावाच्या विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दारू आणि पिकअप वाहन असा एकूण ८ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

साक्री तालुक्यातील बसरावळ गावालगत असलेल्या एका शेतात बनावट विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी शेतातील घरासमोर एमएच ४८ सीबी २४७ क्रमांकाचे पिकअप वाहन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या आढळून आल्या.

पोलिसांनी दारूचा साठा आणि संबंधित पिकअप वाहन ताब्यात घेतले. जप्त केलेल्या दारूची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये, तर पिकअप वाहनाची किंमत ४ लाख ५० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ८ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनेश ऊर्फ अमोश छगन ठिगळे (रा. शेंड्यावड, पोस्ट उमरपाटा, ता. साक्री) याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्री व तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT