पिंपळनेर, जि. धुळे: पिंपळनेर नगरपरिषदेच्या 101 वर्षांच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून डॉ. योगिता चौरे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पदग्रहणाचा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
पदग्रहणाचा सोहळा निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीची सुरुवात श्रीक्षेत्र मुरलीधर मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली नगर परिषद कार्यालयात पोहोचली. तेथे मान्यवरांच्या उपस्थितीत चैतन्य पंडित यांच्या हस्ते विधीवत पूजन करून डॉ. योगिता चौरे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या हस्ते नगराध्यक्षा डॉ. योगिता चौरे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक विनोद कोठावदे, योगेश नेरकर, सतीश शिरसाठ, प्रज्ञा बाविस्कर, आशा महाजन, माया पवार, मनीषा ढोले आणि लीलाबाई राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
नगर परिषदेच्या गटनेतेपदी डॉ. योगिता चौरे यांची, तर प्रतोदपदी प्रज्ञा बाविस्कर यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते ईश्वर बोरसे आणि आनंदा चौधरी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, चंद्रजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, खाकी आखाड्याचे महंत सर्वेश्वरदास महाराज, किशोर संगवी, इंजि. मोहन सूर्यवंशी, इंजि. के. टी. सूर्यवंशी, धनराज जैन, डॉ. जितेश चौरे, माजी सभापती जगदीश चौरे, प्रदीप कोठावदे, जिल्हाध्यक्षा सविता पगारे, मंडळाध्यक्ष विक्की कोकणी, मोतीलाल पोतदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगर अभियंता तेजस लाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, सहाय्यक नगररचनाकार अनिता भोये, वकील शेख, कुसुम पवार, वैभव जवेरी, भूषण महाजन, शैलेश एकखंडे, गुणवंत पाटील यांच्यासह कर्मचारीवर्गानेही शुभेच्छा दिल्या. प्रमोद गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले, तर देवेंद्र गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. आकाश ढोले आणि कुणाल बेनुस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
काँग्रेसकडून शुभेच्छा
डॉ. योगिता चौरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांनी सभागृहात येऊन त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. या मैत्रीपूर्ण कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.