पिंपळनेर, जि. धुळे : अवघ्या जगाला प्रेमाची शिकवण देणारे मातृदयाचे साहित्यिक व थोर समाजसुधारक प. पू. साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त सामोडे येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेत विद्यार्थी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून घोषवाक्यांसह उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. साने गुरुजींचे विचार, प्रार्थनागीते व जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विनायक सिताराम देवरे, संस्थेचे अध्यक्ष शरद दयाराम शिंदे, उपाध्यक्ष हंसराज शिंदे, शेतकी संघाचे संचालक अनिल दयाराम शिंदे, प्रशिक्षण संस्था सामोडेचे चेअरमन प्रकाश दयाराम शिंदे यांच्यासह सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ व जयदया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर नारायण भदाणे (माजी उपसरपंच), विश्वास दगाजी शिंदे, ग्रामसेवक लाडे, साहेबराव धुडकू घरटे, चंद्रकांत याईस, शांताराम भदाणे, मनोज सोनवणे, कन्हैयालाल सोनवणे, समाधान सूर्यवंशी, राजू साळुंखे, विजय घरटे, उमेश रायते यांच्यासह अनेक ग्रामस्थ शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता भदाणे, शिक्षिका मनीषा भदाणे, शिक्षक ज्ञानेश्वर घरटे व कुणाल बेनुस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. माधुरी घरटे यांचे सहकार्य लाभले.