धुळ्यात २४ ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई 
धुळे

धुळे-पार्थडीच्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

धुळ्यात २४ ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई; तीन पिस्तूल, ७ तलवारींसह लाखोंचा ऐवज जप्त

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउट तसेच नाकाबंदीचा उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.२०) राबविण्यात आला. जिल्हाभरात २४ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान तीन पिस्तूल व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या. यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या देखरेखीखाली धुळे जिल्हयात नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २४ ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी तीन पिस्तूल ७ तलवारींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबरोबरच गावठी दारूच्या अनेक भट्टया उध्वस्त करण्यात आल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी १६ लाख ६१ हजार ७८० रूपयांची गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. तसेच दारू बनविण्याचे रसायन, ड्रम व साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

विद्युत वाहिनीची दुरुस्ती करताना विजेचा झटका लागून लाईनमन गंभीर

इंदिरानगर : पाथर्डी सब स्टेशन येथील कार्यरत असलेले लाईन मन( वायरमन) राकेश शेवाळे (वय ३९) हे दामोदर चौकामध्ये विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना विजेचा जोराचा झटका लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताला व चेहऱ्याला मोठी दुखापत झाली आहे. पाथर्डी फाटा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT