Gun Pudhari
धुळे

Dhule news | धुळ्यात मिसफायरिंग होऊन महिला जखमी, एकास अटक

ज्या घराला गोळी लागली, त्याच घरासमोर फायरिंग लाइनमधे एक गन लायसन्स दुकान आणि घर आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शहरात युनिटी सर्कल जवळील एका झोपडपट्टी परिसरातील मिसफायरिंगची घटना चाळीसगांवरोड पोलिस स्टेशनअंतर्गत घडली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी एकास प्राथमिक तपासाच्या आधाराने ताब्यात घेण्यात आले असुन त्याचा हत्यार परवाना रद्द केला आहे.

युनिटी सर्कल जवळील झोपडपट्टी परिसरातील सुमारे 50 वर्षांच्या एक मुस्लिम महिला घरात पाणी पित असताना अचानक सुटलेली गोळी त्यांच्या उजव्या मनगटाजवळून स्पर्श करत गेली. त्यामुळे किरकोळ जखम झाली. त्यानंतर ती गोळी पुढे जाऊन जवळील दुसऱ्या घराच्या पत्र्याला लागली.

जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.या घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः घटनास्थळी पोहोचले. पोलिस प्रशासनाने गोळीबाराचा स्रोत व परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी संपूर्ण परिसरातील घरे व टेरेसची सखोल तपासणी केली आहे.

ज्या घराला गोळी लागली, त्याच घरासमोर फायरिंग लाइनमधे एक गन लायसन्स दुकान आणि घर आहे. याठिकाणी या दुकानातून मिस फायर झाली. राउंड लहान आहे आणि याच दुकानात त्या प्रकारचे राउंड देखील आहेत त्यामुळे सखोल तपासणी केली. यात आरोपी जुबेर मेहमूद पठाण हा गन साफ करत असताना मिसफायर झाला असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर दुकान सील करण्यात आले आहे. तत्काळ गंन लायसन्स कैंसिल करण्याचा प्रस्ताव कलेक्टर कडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT