नीट परीक्षा पेपर फुटीतील घोटाळेबाजांवर कडक कारवाई करावी  Pudhari Photo
धुळे

Dhule News | नीट परीक्षा पेपर फुटीतील घोटाळेबाजांवर कडक कारवाई करावी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भातील घोटाळेबाजांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

देश पातळीवर वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. देशभरातील करोडो विद्यार्थी मेहनतीने संबंधित परीक्षेची तयारी करत असतात. अशावेळी काही कोटी रुपयांसाठी पेपर फोडून घोटाळे केले जात असतील, तर हे योग्य नाही. यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून जिवापाड मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलेला आहे . त्यामुळे ही परीक्षा सरकारने आपल्या अधिपत्याखाली घ्यायला हवी. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी. प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घोटाळा व गडबड झाल्याचे मान्य केलेले आहे.

72 भरती प्रक्रियेमध्ये पेपर फुटीचा दावा

त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विविध भरती करताना पेपर फुटीचेही प्रकरण समोर आलेले आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 72 भरती प्रक्रियेमध्ये पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहेत. असा दावा यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केला. पेपर फुटीचा प्रकार धोकादायक आहे. वशिलाबाजी लावून आडमार्गाने भरती कशी करता येईल, याचा हा प्रयत्न चालू आहे. गुणवंत, हुशार, अभ्यासू विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या संस्था, एजन्सी, काही राजकीय नेते, नोकरशाह यांची यामध्ये मिली भगत दिसून येत आहे. परीक्षा भरती मध्ये सुद्धा माफिया राज दिसून येत आहे. अशा घोटाळाबाज लोकांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नीट परीक्षेतील घोटाळेबाज व पेपर फुटीतील, भरती प्रक्रियेतील घोटाळेबाज, माफिया राज करणारे यांची चौकशी होऊन त्वरित यांच्यावर कारवाई करण्यात यावी, व पारदर्शक परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जोसेफ मलबारी, राजू डोमाडे, नंदू येलमामे, रामेश्वर साबरे,राजेंद्र सोलंकी, दीपक देवरे, सोनू घारू, डॉमिनिक मलबारी ,भिका नेरकर, गोरख शर्मा ,निखिल मोमया, डी. टी पाटील, वाल्मीक मराठे,भटू पाटील, मनोहर निकम, उषा पाटील, जयश्री घेटे, मंगलदास वाघ, अविष्कार मोरे, अमरजीत पवार, भूषण पाटील,विकी डिवरे, राजेंद्र सोनवणे, युसुफ शेख, स्वामिनी पारखे, राजेंद्र चौधरी, सज्जन बागुल, सुरेश जवराळ, शेख उझार, अझर पठाण, भूषण पाटील,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT