धुळे : साक्री तालुक्यातील वासखेडी येथे झालेल्या वादातील आरोपीला आपल्या ताब्यात द्यावे, यासाठी जमावाने निजामपूर पोलीस ठाण्यात बाहेर गोंधळ घातला. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांच्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात जमावाच्या विरोधात जीवे ठार करण्याचा प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील वासखेडी येथे दोन गटात पूर्ववैमानस्यातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणातील एका आरोपीला निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही माहिती दुसऱ्या गटाला मिळाल्यामुळे हा गट आक्रमक होऊन निजामपूर पोलीस ठाण्यावर चालून गेला. यावेळी या गटाने संबंधित आरोपीला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान ही माहिती मिळाल्याने पोलीस दलातील बडे अधिकारी आणि आणखी कुमक निजामपूरकडे पाठवण्यात आली. मात्र तोपर्यंत जमावाने दगडफेक करून पोलिसांच्या दोन वाहनांचे नुकसान केले. पोलीस बळ पोहोचल्यानंतर जमावाला पांगवण्यात यश आले. या घटनेमुळे वासखेडी गावात मोठे तणावाचे वातावरण होते. येथे देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
निजामपूर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल दीपक राजेंद्र महाले यांनी तक्रार दाखल केली असून भरत पंडित पवार, विलास अशोक मालचे, विष्णू साहेबराव भिल, जिगर चंदू मोरे, श्याम पवार ,सुरेश पंडित सूर्यवंशी, अर्जुन भिका ठाकरे, अनंत चुनीलाल भवरे, हर्षल रावसाहेब सूर्यवंशी, दीपक दिलीप मालचे, राजेश भारमल भवरे, शरद ताराचंद भवरे ,रमेश उर्फ करण मोहन मालचे, विकास राजाराम पाटील ,बोला छोटू पवार, विकास दीपचंद सोनवणे, अंबर नानाभाऊ सोनवणे, सागर दिलीप मालचे, गुलाब साहेबराव भवरे, अर्जुन सुभाष मालचे, सुनील महेंद्र सोनवणे, स्वाती जितेंद्र सोनवणे ,रेखा मगन ठाकरे, पुनाबाई भवरे, मिनाबाई दिलीप मालचे, केवळबाई नानाभाऊ सोनवणे, सुमनबाई एलजी मोरे, रंजा सुभाष भिल, सुरेखा छोटू पवार यांच्यासह 30 ते 40 महिलांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रोपिकरण कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दगडफेकीमध्ये एम एच 18 बी एक्स 0214 ,एम एच 18 डि एक्स 0227, एम एच 18 बी एक्स 0229 या पोलीस वाहनांचे काचा फुटून नुकसान झाले आहे. कॉन्सटेबल राकेश ठाकूर, राहुल देवरे यांना जमावाने मारहाण केली. राकेश ठाकूर यांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून त्याला जीवे ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे.
दरम्यान याच प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून यामध्ये भारमल साहेबराव भवरे यांनी फिर्याद दिली असून नाना धनराज, विठोबा बारकू निहाळदे, भैय्या बारकू निहाळदे, योगेश भाऊसाहेब, धाक्या बहादुर, नंदू भिला, दीपक नाना, भैया रतिलाल निहाळदे, संभा भलकारे, दल्या ठेलारी, हिरामण मोहन, दंगल रतन भलकारे (सर्व राहणार जैताने) यांच्यासह वीस ते पंचवीस जणांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात मेंढ्या चालण्याच्या कारणावरून दगडफेक व मारहाण करणाऱ्या आरोपीं सोबतच वाद झाल्याच्या कारणावरून आरोपींनी भिलाटी नजीक चंदू मोरे यास मारहाण केली आहे. यावेळी फिर्यादी मारहाणीपासून थांबवण्यासाठी गेले असता जमावातील एकाने त्याच्या हातातील लोखंडी कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर मारले असता मोरे हे जखमी झाले आहेत. फिर्यादीची पत्नी पूनाबाई ही मध्यस्थी करण्यासाठी गेली असता तिला देखील मारहाण करण्यात आली आहे. जमावाने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.