धुळे

Dhule News | साक्री जवळील शेवाळी फाटा उड्डाणपुलास अखेर मिळाली मंजुरी; अनेक वर्षांची मागणी मान्य!

खासदार पाडवींच्या हस्ते भुमिपूजन, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांची होणार सोय

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर: राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील शेवाळी फाटा येथे गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित होती.अखेर या उड्डाणपुलास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच प्रारंभ व्हावा आणि कामाची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी,यासाठी खासदार गोवाल पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाचा आराखडा, वाहतूक व्यवस्था तसेच स्थानिकांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक सूचना दिल्या.

शेवाळी फाटा हा राज्य महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा चौक असून वारंवार येथे व वाहतूककोंडी अपघातांच्या घटना घडत होत्या. उड्डाणपूल उभारल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार असून परिसराच्या विकासालाही चालना मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खा.पाडवी यांनी केली मंजूर उड्डाणपूल जागेची पाहणी

राष्ट्रीय महामार्गावरील शेवाळी फाटा येथील मंजूर उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी झाल्यानंतर साक्री येथील शासकीय विश्रामगृह येथे तहसीलदार साहेबराव सोनवणे व आदी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्या ठिकाणी खासदार अॅड.गोवाल पाडवी यांनी सूचना केल्या. शेवाळी फाटा हा राज्य महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा चौक असून येथे वारंवार वाहतूककोंडी व अपघातांच्या घटना घडत होत्या.पूल निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासूनची होती.

अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान

या पाहणीवेळी संबंधित विभागाचे अधिकारी,खासदार ॲड.गोवाल पाडवी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रवीण चौरे, तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे,ज्येष्ठ नेते दिलीप काकुस्ते, साक्री शहराध्यक्ष सचिन सोनवणे, सागर देसले, पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम कुवर, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल, मधुकर बागुल, साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव गणेश गावित, शेवाळी गावातील ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव साळुंके, सचिव सुरेश साळुंके, एन.एस. साळुंके, पोपटराव साळुंके पंडितराव साळुंके, भाऊसाहेब वाघ, माजी सरपंच दगाजी साळुंखे लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार असल्याने अनेक वर्षांची स्थानिकांची मागणी अखेर मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT