Dhule News
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने pudhari photo
धुळे

Dhule News | अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कमी निधी दिल्याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

धुळे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीचा पराभव केला. त्याचा राग म्हणून अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कमी निधी दिल्याचा आरोप करीत आज राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निदर्शने करीत आपला निषेध नोंदवला. यावेळी विशालगडावर तोडफोड आणि लुटमार करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कमी निधी देऊन महाराष्ट्राचा अपमान केला. तसेच विशालगडावरील समाजकंटकांनी केलेल्यां नासधुसी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध व्यक्त केला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अतिशय कमी प्रमाणात निधी महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा अपमान करण्यात आलेला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाचे व मित्र पक्षाचे सरकार आहे. त्या ठिकाणी भरघोस निधी देण्यात आला. बिहार, आंध्र प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. उलट महाराष्ट्राला कमी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेमध्ये भाजपला पराभूत गेले, याचा राग घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राचा बदला घेण्याचे काम केलेले आहे. उलट महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त कर, टॅक्सेस भारत सरकारला देत असतो. पण केंद्रीय सरकारने महाराष्ट्रावर तरीही अन्याय केल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.

विशालगडावर घटनेचाही निषेध

या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी निषेध व्यक्त करित केंद्र सरकारचा निषेध केला आहे. तसेच मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या किल्ल्यावर काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणे एका धर्माच्या लोकांना लक्ष करून तोडफोड केली. घरांची नासधुस केली. तसेच घरातून वस्तू पळवुन नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित होत आहे. काही समाजकंटक जाती धर्मात विष पेरण्याचे काम करीत आहे. तरी विशाळगडावरील ज्या समाजकंटकांनी द्वेष पूर्ण वातावरण तयार करून लूटपाट केली आहे.अशांवर त्वरित कारवाई करून अटक करण्यात यावी. अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. यावेळेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजीत भोसले, जोसेफ मलबारी,राजेंद्र चौधरी, भिका नेरकर,राजेंद्र सोळंके, भटू पाटील,राजू चौधरी, भोला सैंदाणे,मंगलदास वाघ, शेख समद, सलमान खान, सोनू गुजर, डॉ मनीष महाजन, डी टी पाटील,गोलू नागमल , राजेंद्र सोलंकी, बंटी वाघ, सुरेश जवराळ, रामेश्वर सांबरे, युसुफ शेख, राजू मशाल, राजू डोमांडे, तसवर बेग, विश्वजीत देसले, ज्ञानेश्वर सोनवणे,यशवंत पाटील, भोला वाघ, नवाब बेग, आण्णा सुर्यवंशी,संजय नेरकर, विक्रांत जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT