पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. सतीश मस्के यांना यावर्षीचा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य लेखन पुरस्कार' छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी समितीद्वारे विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात समतेचे युवा पर्व भीमोत्सव 2024 निमित्ताने पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ.विजय फुलारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे प्र.कुलगुरु प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे, उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. दिलीप चव्हाण यांच्या हस्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे, आधिसभा सदस्य डॉ.हरिदास सोमवंशी, डॉ.प्रकाश इंगळे व मंगेश गवई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.सतीश मस्के यांना या अगोदर शैक्षणिक,सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे सहा ग्रंथ ही प्रकाशित झालेले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर.एन.शिंदे,उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, कॉलेज कमिटी चेअरमन धनराज जैन, संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के.डी.कदम, प्रा.डॉ.धम्मपाल घुंबरे,प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा –