प्रातिनिधीक छायाचित्र Pudhari
धुळे

Dhule News | आठ हजारांवर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा कोटींची मदत, लवकरच थेट खात्यात जमा होणार: आमदार राम भदाणे

पुढारी वृत्तसेवा

धुळे ः धुळे ग्रामीणमध्ये मार्च महिन्यात अतिवृष्टीसह अवकाळी पावसामुळे रब्बी पिके व फळ बागायतीचे अतोनात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. या पार्श्वभूमीवर अविरत पाठपुराव्याला यश आले आहे. आठ हजारावर अवकाळीग्रस्तांसाठी सुमारे पंधरा कोटींवर मदत मंजूर झाली आहे. लांबलेला पाऊस आणि निराश झालेले शेतकरी आणि पेरणीपुर्वी मंजुर झालेली ही मदत मोठी दिलासा देणारी असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले.

आमदार राम भदाणे यांनी सांगितले, राज्य सरकारने धुळे तालुक्यातील १४,२७५ बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे १५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यात आठ हजारावर शेतकर्‍यांची यादी अंतिम झाली आहे. पुढील टप्प्यात उर्वरीत अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांचा समावेश होणार आहे.

त्या कठीण काळात शेतीच्या बांधावर येऊन तुमच्या डोळ्यांतील अश्रू जवळून पाहिले. तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून या संकटात तुम्हाला एकटे सोडणार नाही, असा शब्द दिला होता. तो वास्तवात आणला आहे. अविरत पाठपुराव्याला आणि संघर्षाला मोठे यश आले आहे. ही मदत म्हणजे कष्टाचे पूर्ण मूल्य नाही, पण या कठीण परिस्थितीत पुन्हा उभे राहण्यासाठी नक्कीच बळ मिळेल."

अवकाळीग्रस्त गावे

बोरकुंड, अंबोडे, आर्णी, बाबरे, बाबुळवाडी, बल्हाणे, बेहेड, भोकर, बिलाडी, बोधगाव, बोरीस, बोरविहीर, चांदे, दापुरा, दापोरी, देऊर, धमाणे, धामणगाव, धामणी, धनूर, धोडी, दोंदवड, गाडऊतार, हडसुणे, हेंद्रूण, हेंकळवाडी, विसरणे, जापी, जुनवणे, कापडणे, कावठी, खेडे, खोरदड, कुळथे, कुंडाणे, वार, कुसुंबा, लोणकुटे, मांडळ, मेहरगाव, मोघण, मोहाडी, मोरदड, मोरदड तांडा, मुकटी, नंदाणे, नरव्हाळ, नवलाणे, नवलनगर, नावरा, नावरी, निकुंभे, निंमडाळे, निमगुळ, निमखेडी, न्याहळोद, पिंपरी, रामी, रानमळा, सांजोरी, सरवड, सौंदाणे, सावळदे, शिरूड, सोनगीर, सुट्रेपाडा, तरवाडे, तिखी, उडाणे, वडणे, वडजाई, वणी बु., वणी खु., विंचूर, विश्वनाथ, वडगाव आदी ऐंशीपेक्षा अधिक गावांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT