MLA Kunal Patil
बोरीवरील पुलासह विंचूरला विकास कामांचे लोकार्पण pudhari photo
धुळे

Dhule News | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार : आमदार कुणाल पाटील

पुढारी वृत्तसेवा

धुळे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात धुळे तालुक्यासाठी विकास कामांसाठी सर्वाधिक निधी मंजूर करुन आणला होता. सत्तेमुळे विकास कामांना गती देता येते. येणारा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून धुळे ग्रामीणमधील उर्वरीत कामे पूर्ण करता येतील असे प्रतिपादन आ.कुणाल पाटील यांनी विंचूर येथील एका कार्यक्रमात केले.

आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या 10 कोटी 81 लक्ष रु. खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपुजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विंचूर येथे बोरी नदीवरील नवीन पुलाचेही लोकार्पण करण्यात आले. या कामासाठी आ.कुणाल पाटील यांनी एकूण 4 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार हे होते. या कार्यक्रमात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार असतांना सर्वात जास्त निधी मंजूर करता आला. निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करता आला, याचे खरे समाधान मिळते. म्हणूनच आज मतदार संघात सर्वसामान्य जनतेत प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. येणारा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता निश्‍चित येणार आहे. त्यातून आपल्याला मतदारसंघातील राहिलेली कामे पूर्ण करता येतील. त्यामुळे जनतेने विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार,बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,माजी सभापती गुलाबराव कोतेकर, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, सरपंच सौ.प्रेरणा प्रदिप खैरनार, संचालक पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे, माजी पं.स.उपसभापती देविदास माळी,पं.स.सदस्य दिपक कोतेकर, बाजार समितीचे संचालक ऋषीकेश ठाकरे, योगेश साळुंके, बापू खैरनार,विलास चौधरी,दिनकर पाटील,मधुकर पाटील,संतोष राजपूत,डॉ.संदिप पाटील,साहेबराव पाटील,चुडामण मराठे,पांडूरंग मोरे, उत्तमसिंग राजपूत,डॉ.दत्तात्रय परदेशी, सुभाष बोरसे, गोरख खैरनार, जनार्दन देसले, मांगुलाल सजन बोरसे, चेअरमन शशीकांत देसले, उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT