Jalna Crime News : मुलीचे अपहरण करून बळजबरीने लावले लग्न File Photo
धुळे

Dhule Crime : दोंडाईचा येथे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणांचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शासनाने प्रतिबंधित केलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्यांचा अनधिकृत साठा दोंडाईचा शहरात आढळून आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीवर आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांना यासंदर्भात वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, अशा प्रकारचा साठा आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला होता.

मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून दोंडाईचा येथील गरीब नवाज नगरातील एका घरात प्रतिबंधित बियाण्यांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार, कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने संबंधित घरावर छापा टाकला. या कारवाईत ७२ हजार ७५० रुपये किमतीचा अवैध बियाणे साठा जप्त करण्यात आला.

या साठ्याबाबत निजाम कमरुद्दीन मन्सुरी याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. हा सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्याने, तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक मयूर गौतम भामरे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार, निजाम मन्सुरी याच्या विरोधात बीएनएस (BNS) कायदा कलम ३१६, ३१८, अनधिकृत कापूस बियाणे विक्री प्रतिबंधक नियम १९६८ मधील कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३ आणि बियाणे नियंत्रण आदेश १९८३ मधील खंड ३, ४, ८, ९, १३ व १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT