Dhule News | अवधान एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : 71,800 रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त Pudhari File Photo
धुळे

Dhule News | अवधान एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : 71,800 रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त

भेसळीचा संशय असल्याने कारवाई, एका आस्थपनाला व्यवसाय परवानाच नाही

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे येथील अवधान एमआयडीसी परिसरातील काशवी फूड्स व आदित्य फूड्स या आस्थापनांची अन्न सुरक्षा विभागाने तपासणी केली. यावेळी काशवी फूड्स येथून पोंगा तर आदित्य फूड्स येथून नमकीन (सुस्वाद) या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

तपासणीत मे. काशवी फूड्सकडे अन्न व्यवसाय परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच विनापरवाना अन्नसाठा व विक्री, खरेदीसंदर्भातील अभिलेखांचा अभाव आणि अस्वच्छ ठिकाणी अन्नसाठा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित पेढीस व्यवसाय बंदची नोटीस बजावण्यात आली.

भेसळीचा संशय असल्याने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कारवाई करत काशवी फूड्समधील 536 पॅकेट्स पोंगा (अंदाजे किंमत 26 हजार 800 रुपये) आणि आदित्य फूड्समधील 300 पॅकेट्स नमकीन (सुस्वाद) (अंदाजे किंमत 45 हजार रुपये) असा एकूण 71 हजार 800 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार व शशिकांत राणे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

अन्न व्यवसायिकांनी वैध परवाना अथवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा तसेच अन्नपदार्थांचा साठा स्वच्छ व आरोग्यदायी ठिकाणी ठेवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT