धुळे : धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, शरद मंडलिक, बालाजी क्षीरसागर, तहसीलदार पंकज पवार आदींसह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग प्रशासनाचा कणा आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विभागाशी संबंध येतो. त्यामुळे नागरिकांच्या सेवा-सुविधा आणि विविध समस्यांवर संवेदनशीलतेने काम व्हायला हवे.
निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांनी सांगितले की, महसूल सप्ताहात दररोज विविध उपक्रम राबवले जातील. नैसर्गिक आपत्ती, संजय गांधी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील अनुदान वेळेत वितरित करण्यात आले असून, उत्कृष्ट कामगिरीबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे.धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, लाडकी बहिण योजना, ॲग्रीस्टीक योजनेसह विविध योजनांची अंमलबजावणी वेळेत झाल्याचे नमूद केले. बालाजी क्षीरसागर यांनी ई-प्रणाली आणि एआयचा प्रभावी वापर करून विभागाच्या प्रतिमेत वाढ करण्याचे आवाहन केले.
साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी कोरोनाकाळात महसूल विभागाने केलेल्या कार्याचा उल्लेख करत पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.
साहेबराव सोनवणे, महेंद्र माळी, संजय पवार, महेश साळुंखे, संतोष जोशी, अनिता भामरे, अनिल बाविस्कर, सदाशिव सूर्यवंशी, विनोद चौधरी, मन्सुर शेख, ज्ञानेश येवला, श्रद्धा पाटील, विलास मोरे, सुजीत पाटील, छाया राऊत, महादेव पवार, राजेंद्र बोरसे, अजय पवार, नानाजी पवार, हर्षल माळी, संजय पाटील, भिमराव मोहिते आदींचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. जितेंद्र सोनवणे व अर्चना पावळ यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी आभार मानले.