धुळे

Dhule News : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते धनादेश वितरीत

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा; भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियातील अवलंबितांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक हर्ष बहादुर्गे, लिपिक प्रशांत लिंगायत, रुपाली मनोज गायकवाड (वीरपत्नी ), रेखा लक्ष्मण गायकवाड (वीरमाता), लक्ष्मण पतींगराव गायकवाड (वीरपिता) आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील शहीद जवान मनोज गायकवाड हे 18 नोव्हेंबर, 2022 रोजी जम्मू काश्मीर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावतांना असतांना तेथील अतीबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे शहीद झाले होते. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वारसांना शासकीय निधीतून 50 लाखाची आर्थिक मदत दिली असून या मदतीचा धनादेश रुपाली मनोज गायकवाड (वीरपत्नी) 30 लक्ष, रेखा लक्ष्मण गायकवाड (वीरमाता) 10 लक्ष, लक्ष्मण पतींगराव गायकवाड (वीरपिता) 10 लक्ष असे एकूण 50 लक्ष रुपयांचे धनादेश वारसांना वितरीत करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी कुटूंबाची आस्थेवाईक चौकशी करुन अडीअडचणी विषयी माहिती जाणून घेतली. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजनिधी संकलनात केला जातो. यासाठी जिल्हातील नागरिक, खाजगी आस्थापना, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजनिधी संकलनात योगदान देण्याचे आवाहनही गोयल तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT