minor girl Abuse
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल File Photo
धुळे

Dhule News | अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षाची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

धुळे : अल्पवयीन ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रविंद्र दोधु बेहरे यास वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी ठोठावली आहे.

धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पिडीतेच्या झोपडीत ही घटना घडली होती. धुळे तालुक्यातील एका खेडे गांवात झोपडीतील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांची पिडीत अल्पवयीन मुलगी हिस आरोपी रविंद्र दोधु बेहरे याने घरात एकटी असल्याची संधी साधत पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती.

तक्रारीानुसार बेहेरे याच्या विरोधात भादवि कलम ३७६ (१), (२) (आय) तसेच बालकांचे अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ व ६ तसेच अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (डब्लु), (२) (पाच) अन्वये सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यानंतर चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांनी आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी होउन त्यात सरकार पक्षातर्फे एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले.

सुनावणीमध्ये फिर्यादी पिडीतेची आई, पिडीता, पिडीतेचा भाऊ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल शिंदे, पंच साक्षीदार, तसेच तपासी अधिकारी प्रदिप मैराळे यांची साक्ष नोंदविण्यांत आली. तसेच आरोपी तर्फे बचावासाठी एक साक्षीदार तपासण्यांत आला. सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करतांना अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश यशवंत पाटील यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्लेषनाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तीवाद केला.

सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेले साक्षीदार आणि जिल्हा सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती यास्मीन देशमुख यांनी खटल्यातील असलेल्या संपुर्ण पुराव्यांचा व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकालांचा सांगोपांग विचार करुन आरोपी रविंद्र दोधु बेहरे यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ६ अन्वये वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ३० हजार रुपयाचा दंडाची शिक्षा दिली. सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश यशवंत पाटील यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर, यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

SCROLL FOR NEXT