धुळे तालुक्यातील रतनपुरा येथे उत्साहात केसरी बैलगाडी स्पर्धा रंगली. (छाया : यशवंत हरणे)
धुळे

धुळे : रतनपुरा येथे रंगली आमदार केसरी बैलगाडी शर्यत

विजयी बैलजोडीचा रोख रक्कम देवून सन्मान

पुढारी वृत्तसेवा

धुळे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी शर्यत प्रसिद्ध आहे. धुळे तालुक्यातील रतनपुरा येथे प्रचंड प्रतिसादाने ही स्पर्धा रंगली. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी शासकीय मान्यता मंजूर करून आणल्यानंतर या स्पर्धेचा ऐतिहासिक प्रारंभ केला .

तालुक्यातील रतनपुरा बोरकुंड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत (ओपन मैदान) आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम युवा आमदार राम भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बैलगाडी शर्यत धुळे तालुक्यात व्हावी, यासाठी आमदार राम भदाणे यांनी शासन दरबारी योग्य ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. तथा स्पर्धा मंजूर करून घेतली आणि यशस्वीरित्या स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत अनेक जळगाव, धुळे येथील बैलजोडी शर्यतीसाठी हजर झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून 51 हजाराचे बक्षिस हे गोंडगाव येथील बैलजोडी, द्वितीय क्रमांक 41 हजार रुपये पवाने येथील बैलजोडी तर तृतीय क्रमांक 31 हजार रुपये चाळीसगाव आणि चतुर्थ क्रमांक मिळवत 21हजार रुपये बांबरुड येथील बैलजोडी तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 11 हजार रुपये रतनपुरा बोरकुंड येथील पंकज भोसले यांनी पटकावले आहे.

विजयी पाचही विजयी बैलजोड्यांची रतनपुरा गावात आयोजक माजी सरपंच सुनील चौधरी व घाडरे सरपंच मुन्ना पवार, रतनपुरा गावातील ग्रामस्थ सर्व आयोजक मंडळी यांनी डीजेच्या जल्लोषात सर्व गावातून विजयी मिरवणुक काढली. तालुक्यातील पहिली शासनमान्य आमदार केशरी बैलगाडा शर्यत कार्यक्रम उत्साहात पार पडला. शर्यतीला मिळालेला प्रचंड प्रतिसादामुळे ग्रामीण क्रीडासंस्कृतीला नवे बळ मिळाले असल्याचे मत ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव‌, माजी जिल्हा परिषद सदस्य रामकृष्ण खलाणे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब माळी, वाल्मीक पाटील, मधुकर माळी, सचिन देवरे, मयुर चौधरी, संजय नवसारे, आप्पा पैलवान, बापू जाधव, डॉक्टर राजेश पाटील, डॉक्टर अनिल पाटील, भटु पाटील, वाल्मीक मालचे, कैलास मालचे, भूषण कोळी, सुनील वाघ, गोकुळ अण्णा जाधव, संजू बापू पवार, अशोक माळी, विलास ठाकरे, योगेश पवार, सतीश बिरारी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT