Dhule Lightning Strike | साक्री तालुक्यातील खुडाणे येथे वीज कोसळून 27 मेंढ्यांसह 10 बकऱ्या ठार!  
धुळे

Dhule Lightning Strike | साक्री तालुक्यातील खुडाणे येथे वीज कोसळून 27 मेंढ्यांसह 10 बकऱ्या ठार!

पुढारी वृत्तसेवा

धुळे : साक्री तालुक्यातील खुडाणे येथील जंगलातील एका डोंगरावर वीज कोसळल्याने तब्बल 27 मेंढ्या व 10 बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मेंढपाळ देखील किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील खुडाणे शिवारातील जंगलात ज्ञानेश्वर तिरधाप हे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक पावसाळी वातावरण तयार झाले. यानंतर विजेचे तांडव सुरू झाले. त्यामुळे तिरधाप यांनी मेंढ्या आणि बकऱ्या सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र याच वेळेस वीज कोसळल्याने तब्बल 27 मेंढ्या आणि 10 बकऱ्या जागीच ठार झाल्या.

यावेळी तिरधाप यांना देखील किरकोळ दुखापत झाली. दरम्यान ही माहिती कळाल्याने ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते . या मेंढ्या धनराज तिरधाप यांच्या देखील असल्याचे सांगितले जात असून महसूल विभागाने तातडीने या घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान विजे मुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई देण्याची मागणी होते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT