Leopard Attack Pudhari
धुळे

Dhule Leopard Attack : शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाचा बालक ठार!

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर तालुक्यातील अर्थे गावाजवळील शेतामधील झोपडीसमोरून मजुरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील कुटुंबातील दोन वर्षे वयाच्या मुलाला बिबट्याने ओढुन नेल्याची घटना घडली आहे. या मुलाचा मृतदेह शोधून काढण्यात आला असून आता वनविभागाने ड्रोन कॅमेराच्या मदतीने या बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असून या भागामध्ये पिंजरे लावण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

शिरपूर तालुक्यातील वनविभागाच्या बोराडी रेंज मधील अर्थे गावाजवळ शेख रऊफ शेख सुलेमान खाटीक यांच्या शेतात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या शिवारामध्ये शेतात मध्य प्रदेश राज्यातील मजूर रोजगारासाठी आले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या शेतात पावरा परिवार शेख यांच्या शेतात रखवालदारीचे काम करण्यासाठी आले आहेत.

त्यांचा दोन वर्षांचा मुलगा झोपडी बाहेर होता.यावेळी बिबट्याने त्याला ओढून नेले. ही बाब निदर्शनास आल्यामुळे पावरा परिवाराने नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर ही माहिती वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. ड्रोन कॅमेराच्या मदतीने या बालकाचा शोध घेण्यात आला. मात्र सकाळी या बालकाचा मृतदेह आढळून आला.

या संदर्भात माहिती देत असताना सहाय्यक वनसंरक्षक राहुल घरटे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. बालकाला बिबट्याने ओढून नेल्याची माहिती कळताच अनुभव असणाऱ्या वनविभागाच्या पथकाला तातडीने शोध कार्य राबवण्यास सुरुवात केली. यात थर्मल आणि ड्रोन कॅमेराच्या मदतीने शोध घेण्यात आला.

आता बालकाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून बिबट्याच्या शोधासाठी पथकाने ट्रॅप कॅमेरे लावले असून ड्रोन कॅमेरा च्या मदतीने देखील त्याचा शोध घेतला जातो आहे. परिसरात आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे. हा बिबट्या जेरबंद होईपर्यंत किमान दोन दिवस स्थानिक नागरिक आणि मजुरांनी शेतावर जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन देखील वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT