धुळे : जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या आण्णासाहेब चुडामण पाटील स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे धुळ्याजवळील नकाणे तलाव व हरणमाळ परिसरात 2 हजार सिडबॉल रोपण व 200 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. हरीत महाराष्ट्र - समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील आणि सचिव डॉ. ममताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरे, रक्तदान, जनजागृती उपक्रम राबवले जातात. पर्यावरण असंतुलन व झाडांच्या कत्तलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून वृक्षलागवड व सिडबॉल रोपणाचा निर्णय घेण्यात आला.
आम्ही आरोग्य क्षेत्रात केवळ उपचारच नाही तर सामाजिक दायित्वही पार पाडत आहोत. माफक दरात आरोग्यसेवा देण्याचा आमचा संकल्प कायम राहील, असे मत डॉ. ममता पाटील यांनी व्यक्त केले.
वृक्षलागवडीनंतर झाडांच्या देखभालीकडे दुर्लक्ष न होता, संगोपन आणि निगराणीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक झाडाची योग्य निगराणी ठेवली जाणार असून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यात येणार आहे.डॉ. ममता पाटील