खुनातील मोक्काच्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले Pudhari
धुळे

Dhule Crime | रुग्णालयातून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड: कर्तव्यात कसूर करणारे २ पोलीस निलंबित

धुळे येथील मुंबई - आग्रा महामार्गावरील टोल नाका नजीक धारदार शास्त्राने राहुल मिंड या तरुणाची हत्या

पुढारी वृत्तसेवा

Hospital escape accused arrested Dhule

धुळे : धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या खुनातील मोक्काच्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान या प्रकरणात दोन पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

धुळे येथील मुंबई - आग्रा महामार्गावरील टोल नाका नजीक धारदार शास्त्राने राहुल मिंड या तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणात आरोपींवर खून तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात न्यायाधीन बंदी आरोपी गणेश अर्जुन सोनवणे ऊर्फ गण्या डमऱ्या हा सध्या 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाने त्याला उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते.

सदर उपचारा दरम्यान आरोपी गणेश अर्जुन सोनवणे याने संधीचा फायदा घेऊन सिव्हील हॉस्पीटल येथून पलायन केले. त्याअनुषंगाने धुळे शहर पोलीस स्टेशन येथे बीएनएस 262 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथक गठीत केले. या पथकातील सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई चेतन मुंढे, पोउनि शाम निकम आणि पोलीस अंमलदार दिनेश परदेशी, पवन गवळी, राहुल सानप, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, अमोल पाटील व अमोल जाधव यांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू केला.

त्याचप्रमाणे गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून माहिती काढणे देखील सुरू केले. त्यातच पथकाला फरार आरोपी डमऱ्या हा मोहाडी उपनगर परिसरातील भागात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तातडीने जाऊन शोध घेणे सुरू केले. यावेळी पोलीस पथक आल्याचे पाहून डमऱ्या याने पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यामुळे पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी गणेश डमऱ्या याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना बंदोबस्तास असणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अमर देविदास खराटे आणि गोविंदा रमेश मोरे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT