धुळे

धुळ्यात महिला शिपायाचा कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न

Dhule news | या संदर्भात आता पोलीस प्रशासनाने देखील तपास सुरू केला आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : साक्री पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणाऱ्या महिला शिपायाने धुळे येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या संदर्भात आता पोलीस प्रशासनाने देखील तपास सुरू केला आहे.

साक्री पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणाऱ्या पोलीस शिपाई भिमभाई राजू पवार (2021 बॅच) यांनी त्यांच्या धुळे येथिल राहत्या शासकीय निवासस्थानी कीटकनाशक प्राशन केले आहे. ही बाब निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अत्यावश्य आहे.

दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वाद हा या घटनेमागील संभाव्य कारण असल्याचे सांगितले जाते आहे. सदर घटनेनंतर त्यांना तात्काळ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक असून वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT