धुळे : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, महाराष्ट्र राज्य व गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यावर्धिनी महाविद्यालयातील सेवानिवृत्त उपप्राचार्य डाॅ. बी. आर. जोशी यांना कै. घनश्यामदासजी मोतीलालजी सोनी जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
तत्त्वज्ञान विषयाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. अध्यक्ष ॲड. सदानंद फडके यांच्या हस्ते मानपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. बी. आर. जोशी (वय ९२) यांनी अध्ययन - अध्यापनासह संशोधनकार्य, लेखन आणि शैक्षणिक कार्यात अत्यंत मौलिक कामगिरी बजावून मोठा नावलौकिक मिळविलेला आहे. मानपत्राचे शब्दांकन डॉ. देवेंद्र विसपुते यांनी केले आहे.
याप्रसंगी नियमक मंडळाचे अध्यक्ष ॲड. केशव वझे, प्राचार्य सुनील गायकवाड महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे संमेलन अध्यक्ष प्राचार्य नागोराव कुंभार, परिषदेचे अध्यक्ष प्रा सुनीलदत्त गोरे, कार्याध्यक्ष अमन बगाडे, सदस्य डॉ. बाजीराव पाटील, भारतीय दार्शनिक अनुसंधान नवी दिल्लीच्या सदस्य डॉ. नमिता निंबाळकर, प्रा. डॉ. दिलीप नागरगोजे, स्थानिक सचिव डॉ. रेखा शेरकर व परिषदेच्या कार्यकारी मंडळासमवेत महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.