मुंबई- आग्रा महामार्गावरील एसबीआयच्या एटीएममध्ये चोरी Pudhari Photo
धुळे

Dhule Crime | मुंबई- आग्रा महामार्गावरील एसबीआयचे एटीएम फोडून चोरी

एटीएम सेंटर जाळण्याचाही प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर असणाऱ्या शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर अज्ञात चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी एटीएम सेंटरला जाळण्याचा प्रयत्न केला असून सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये दोघे चोरटे कैद झाले आहे. या संदर्भात आता धुळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

एटीएम सेंटर जाळण्याचाही प्रयत्न

शिरपूर तालुक्यातील तापी नदी लगत असणाऱ्या सावळदे गावाच्या फाट्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. आज भल्या पहाटे या एटीएम सेंटर मधून धुर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही माहिती पोलीस दलाला देण्यात आली. त्यानुसार शिरपूर शहर तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली

सीसीटीव्हीचे फुटेज मध्ये दोन चोरटे

यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन कटर च्या मदतीने कापले असावे अशी बाब प्राथमिक तपासात दिसून आली. त्यामुळेच एटीएम सेंटरला आग लागली. दरम्यान सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले असता यात दोन चोरटे दिसून आले आहेत. यातील एका चोरट्याने महिलेचे कपडे घातल्याचे आणि तोंड झाकल्याचे दिसून आले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे फिरवली असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे अशाच प्रकारे एटीएम सेंटर फोडण्याचे काम चोरट्यांनी केले असुन या दोन्ही चोरी मधील चोरटे एकच असावे, असा प्राथमिक अंदाज धुळे पोलिसांना आहे. दरम्यान मध्य प्रदेशात देखील गेल्या महिन्यांमध्ये अशाच पद्धतीची चोरी झाली असून मध्य प्रदेश पोलीस देखील याच चोरट्यांच्या मागावर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT