Dhule Crime| मुंबई आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराच्या आवारातील श्रीराम मंदिरात धाडसी चोरी 
धुळे

Dhule Crime| मुंबई आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराच्या आवारातील श्रीराम मंदिरात धाडसी चोरी

मूर्तीचे मुकुट चोरीस तसेच चोरट्यांनी दानपेटीदेखील फोडली

पुढारी वृत्तसेवा

धुळे: धुळे तालुक्यातील आर्वी नजीक मुंबई आग्रा महामार्गावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री रोकडोबा हनुमान मंदिराच्या आवारातील श्रीराम मंदिरातील मूर्तीचे मुकुट चोरीस गेले आहेत .याच मंदिरातील दानपेटी देखील चोरट्यांनी फोडली आहे.

धुळे तालुक्यातील आर्वी नजीक मुंबई आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिरात आज चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती धुळे शहरात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान धुळे पोलिसांना ही माहिती कळाल्याने माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांनी तात्काळ मंदिराकडे धाव घेतली.

चोरांनी रोकडे हनुमान मंदिर आवारातील श्रीराम मंदिरात दानपेटी फोडल्याची बाब निदर्शनास आली .याच मंदिरातील श्रीराम , लक्ष्मण,सीता व हनुमान यांच्या मूर्तीचे चांदीचे मुकुट चोरांनी लांबवले. श्वान पथकासह ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाला चोरांचा माग काढण्यात अपयश आले. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT