Death Case  Pudhari
धुळे

Dhule heatstroke death| धुळ्यात उष्माघातामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

दिवसभर उन्हात काम करुन आल्यानंतर झोपेतच झाला मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे तालुक्यातील कुंडाणे वेल्हाणे येथील एका तरुण शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. उन्हात काम केल्यानंतर तो घरी परत आला. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो झोपला. यात झोपेतच त्याचे निधन झाले. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धुळे तालुक्यातील कुंडाणे वेल्हाणे येथे राहणारे योगेश सिताराम पाटील (वय 44) हे मजुरी करण्याचे काम करतात. त्यांनी भर उन्हामध्ये दिवसभर मजुरीचे काम केले. यानंतर ते सायंकाळी सात वाजेला घरी परत आले. यावेळी त्यांनी घरी उन्हामुळे त्रास होत असल्याने आपण छतावर झोपण्यासाठी जात असल्याचे सांगून ते छतावर निघून गेले.

सायंकाळी उशिरा त्यांना परिवारातील सदस्य जेवण करण्यासाठी उठवण्यासाठी गेले असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले . मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT