धुळे : लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सत्र न्यायमुर्ती श्रीमती यास्मीन देशमुख यांनी ठोठावली.
धुळे तालुक्यातील एका खेडे गावातील अल्पवयीन १७ वर्षाची पिडीता हिस दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पिडीता हिस विशाल रमेश कोळी याने गावातून लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून मोटार सायकलवर व नंतर लक्झरीत बसवून पळवून नेले. तिच्यावर प्रवासात तसेच गुजरात राज्यातील सामरखा येथे आरोपी याने पिडीतेची संमती नसतांना व अल्पवयीन आहे, हे माहित असतांनाही तिचेवर वारंवार लैगिंक अत्याचार केले.
त्याबाबतीत धुळे पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३६३, ३६६,३७६ (२), एन व सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४, ६, प्रमाणे पिडीतेच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली. सदर बाबतीत पोलीस उप निरीक्षक कैलास पंढरीनाथ चौधरी यांनी गुन्हयाचा तपास सुरू केला. यात आरोपी हा गुजरात राज्यात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस पथक तेथे पोहोचले असता पीडितेला आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले. यानंतर करुन आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले. पीडीतीने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना तसेच न्यायालयात दिलेल्या जवाबात सांगितली.
या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्या. श्रीमती यास्मीन देशमुख यांच्या न्यायालयात सुरु झाले असता अतिरीक्त सरकारी अभियोक्ता गणेश वाय. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे ६ महत्वाच्या सांक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात सादर केल्या. त्यात पिडीता, पिडीतेचे वडील, बारकू पाटील व ज्ञानेश्वर बागले, डॉ. भावना आशिष कांकरिया, ए. पी. आय. कैलास पंढरीनाथ चौधरी यांची साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. सरकार पक्षांतर्फे खटला उपलब्ध पुराव्याच्या आधारे सिध्द करण्यांत आला.
या खटल्यात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करतांना अतिरीक्त सरकारी अभियोक्ता गणेश वाय. पाटील यांनी साक्षीदार यांची साक्ष, वैद्यकिय पुराव्यांच्या अनुषंगाने केलेला युक्तीवादाचा आधार घेत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रखर युक्तीवाद केला.त्यानुसार सत्र न्यायमुर्ती श्रीमती यास्मीन देशमुख यांनी आरोपीस भादंवि कलम ३७६ (२), एन व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४ व ६ प्रमाणे दोषी ठरवून २० वर्षाचा सश्रम कारावासची शिक्षा व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनवली. या कामी सरकार पक्षाला जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.