पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; येथील कर्म आ.मा.पाटील विद्यालयाच्या सन 1980 च्या एस.एस.सी.बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल 43 वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून, जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दमंडकेश्वर लान्स येथे झालेल्या कार्यक्रमाला पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, रामचंद्र भामरे, माजी प्राचार्य एम.पी.सोनवणे, डी. एल.शिंदे, एच.एन.पाटील, जी.आर.जगताप, व्ही.एच. नंदन, व्ही.आर.सोनार, एच. आर.गांगुर्डे, एस.एस.वंजारी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक माजी प्राचार्य ए. बी.मराठे यांनी केले. यानंतर एम.पी.सोनवणे यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. तसेच एच.एन. पाटील, डी.एल.शिंदे, जी. आर.जगताप आदी शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांनी आठवणी जागा केल्या. त्यानंतर एच.एन.पाटील, व्ही. एच.नंदन आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एस.कोठावदे व एन.डब्ल्यू वाघ यांनी केले. तर स्वागत गीत व ईशस्तवन प्रा.शिंपी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ए. बी.मराठे, प्रदीप भामरे, रघुवीर शेळके, प्रेमकुमार शिरवाडकर, अशोक पाटील, देविदास येवले, चंद्रशेखर कोतकर, अरुण निकुम, बापू मालपुरे, भरत चौधरी यांनी परिश्रम घेतले.