धुळे : शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत या संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर अध्यक्षपदी बबनराव चौधरी व उपाध्यक्षपदी मोहन सोनवणे यांची निवड झाली आहे.
शिरपूर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत या संस्थेच्या व्यवस्थापक समितीची संचालक मंडळची निवडणुक बिनविरोध झाली. यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध झाली आहे. संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण मतदार संघातील संचालक म्हणून दिपक पुरुषोत्तम पाटील शहादा, जि. नंदुरबार, मोहन दयाराम सोनवणे मु.पो. मांडळ, ता. शिरपूर , संभाजी हिरामण पाटील मु.पो. बाळदा, ता. शिरपूर, प्रविण जाधव पाटील मु.पो. कहाटुळ, ता. शहादा , प्रशांत बबनराव चौधरी, शिरपूर, अविनाश गोविंद पाटील, शिरपूर, अग्रवाल महेशकुमार रामेश्वर अग्रवाल रा. शिरपूर, महिला प्रतिनिधी संचालिका म्हणुन राठी निलिनी किशोर, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी संचालक म्हणून बबन रावजी चौधरी, भटक्या विमुक्त जाती व जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनधी संचालक म्हणुन निंबा ओंकार धनगर यांची निवड झाली आहे.
शिरपूर तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध जाहिर करण्यात आले. अध्यक्षपदी बबनरावजी चौधरी तर उपाध्यक्षपदी मोहन दयाराम सोनवणे यांची निवड बिनविरोध झाली. माजी आमदार तथा संस्थेचे संचालक संभाजीराव पाटील यांनी नवनियुक्त अध्यक्ष बबन रावजी चौधरी व उपाध्यक्ष मोहन दयाराम सोनवणे यांचा सत्कार केला.