Crime News
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न File Photo
धुळे

धुळे : दारू पाजण्यास नकार दिल्याने तरूणावर प्राणघातक हल्ला; दोघांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

धुळे ; पुढारी वृत्तसेवा

दारू पाजण्यास नकार दिल्याने तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हल्लेखोर संशयीत आरोपी गेल्या आठवडाभरापासून फरार होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आता शिताफीने अटक करून गजाआड केले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल राज पॅलेस मध्ये मध्यरात्री अमोल राजेंद्र देसले व त्याचे मित्र राज ऊर्फ कृष्णा जगन अहीरे, मनोज भगवान शिरसाठ असे जेवण करीत होते. यातील संशयीत आरोपी भुषण रोहीदास पाचारे व कृष्णा दिनेश गायकवाड तेथे आले. त्यांनी राज ऊर्फ कृष्णा जगन अहीरे यास दारु पाजण्याच्या कारणावरुन वाद घातला. या कारणावरुन राज ऊर्फ कृष्णा जगन अहीरे व अमोल राजेंद्र देसले यांच्यावर स्टिलच्या रॉडने व काचेची बाटली डोक्यात मारुन जीव घेण्याच्या उद्येशान खुनी हल्ला करुन पळुन गेले.

दरम्‍यान गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हॉटेल राज पॅलेसच्या मालकाने गंभीर घटना पोलिसांना कळवली नाही. दरम्यान या हाणामारीची क्लिप प्रचंड व्हायरलही झाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या संशयीत आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथकाला या संशयीत आरोपींच्या शोधासाठी रवाना केले.

यासंदर्भात गुन्हा दाखल होता. घटना घडल्यापासुन सदर संशयीत आरोपी फरार झाले होते. दरम्यान पथकाला या गुन्हयातील फरार आरोपी सुरत बायपास रोडवरील हॉटेल भंडारा जवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे असई शाम निकम, पोहेकॉ संदीप सरग, संतोष हिरे, मायुस सोनवणे, संदीप पाटील, प्रकाश सोनार, तुषार सुर्यवंशी, किशोर पाटील, योगश जगताप या पथकाने तातडीने हालचाली करून सुरत बायपास रोडवरील हॉटेल भंडारा येथे जावुन संशयीत आरोपींचा शोध घेतला. यावेळी दोघे संशयीत आरोपी मिळुन आल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयाच्या पुढील तपासासाठी मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT