धुळे

धुळे : साक्रीत जैन समाजातर्फे अणुव्रत उद्बोधन सप्ताह

गणेश सोनवणे

पिंपळनेर : तालुक्यातील साक्री येथे जैन समाजातर्फे अणुव्रत उद्बोधन सप्ताह आयोजित करण्यात आला. या सप्ताहात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

चातुर्मासासाठी आलेले राष्ट्रसंत आचार्य महाश्रमणजी यांच्या शिष्या साध्वी श्रीजी पावन प्रभाजी, साध्वी श्रीजी आत्मायशाची, सवी श्रीजी उन्नतयशाची, साध्वी श्रीजी रम्यप्रभाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. या उपक्रमासाठी अणुव्रत सोसायटीची स्थापन करण्यात आली. सोसायटीतर्फे सात दिवस दररोज वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

तेरापंथ भवनात साध्वी श्रीजी पावन प्रभाजी यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन झाले. त्यांनी निरोगी जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी ओम शांती केंद्राच्या शीला दीदी यांनी मार्गदर्शन केले. अणुव्रताच्या नियमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्तीचा संकल्प केला. समितीच्या कार्याची माहिती अध्यक्षा जोशीला पगारिया यांनी दिली.

या सप्ताहात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय बच्छाव यांच्यासह 600 विद्यार्थी सहभागी झाले. समितीच्या अध्यक्षा जोशीला पगारिया, उपाध्यक्षा सुरेखा कर्नावट, भारती कांकरीया आदी उपस्थित होत्या. या सप्ताहात विद्यार्थ्यांना अणुव्रताच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले.

SCROLL FOR NEXT