धुळे

Dhule Accident : धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत दांपत्य जागीच ठार

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे राहणारे अशोक दिनकर भदाणे (वय ५८) व लताबाई अशोक भदाणे (वय ५२) हे धुळे शहरात कामानिमित्त आले होते. काम आटपून ते धुळे-सोलापूर महामार्गाने बोरकुंड गावाकडे जाण्यासाठी निघाले.

त्यांची दुचाकी गरताडजवळील रेल्वे पुलाजवळ आली असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारच्या (क्रमांक MH 18 CE 1939) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अशोक भदाणे आणि लताबाई भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT