यु ट्यूब सोशल साईट वरुन बंद बुलेट मोटरसायकल चालू करण्याची माहीती घेऊन दुचाकी चोरणारी टाेळी ताब्यात घेताना स्थानिक गुन्हे शाखा.  (छाया: यशवंत हरणे)
धुळे

Dhule | 'यु ट्यूब' वरुन माहिती घेत बुलेट चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे शहर आणि परिसरातून बुलेट मोटरसायकलची चोरी करणारे टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना यश आले आहे. या चोरट्यांकडून चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक बाईक जप्त करण्यात आली आहे. या चोरट्यांमध्ये दोघा अल्पवयीन बालकांचा देखील समावेश आहे.

धुळे शहरांमध्ये बुलेट चोरीचे सत्र सुरू झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना या संदर्भात समांतर चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक पवार यांनी सदर मोटरसायकलींचा शोध घेणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांची पथक नेमण्यात येवून सदर पथकास सुचना देण्यात आल्या होत्या.

पोलीस पथकाने मंगळवार (दि.३०) रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम सुर्या जिम हा चाळीसगाव रोड परिसरात फिरत असलेबाबत कळाल्याने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी लागलीच पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमरजित मोरे, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, गुलाब पाटील, राजीव गिते, संजय पाटील, अमोल जाधव, सुनील पाटील या पथकाने सुर्या वावरत असलेल्या परिसरात गस्त घातली.

यु ट्यूब वरुन मिळाली बंद बुलेट सुरु करण्याची कल्पना

पाेलीस पथकाने परिसरात शोध घेतला असता विधी संघर्षित बालक मिळून आल्याने त्यास चोरी केलेल्या बुलेट बाबत माहिती विचारता त्याने यु ट्यूब या सोशल साईट वरुन बंद बुलेट मोटरसायकल चालू करण्याची माहीती घेऊन दुसऱ्या विधी संघर्षित बालकाच्या मदतीने चोरी केल्याची प्राथमिक तपासात उघड झाले.

दोन अल्पवयीनसह या आरोपींना घेतले ताब्यात

दोघा अल्पवयीन मुलांनी त्यांचे मित्र रुपेश ज्ञानेश्वर बारहाते, विपुल राजेंद्र बच्छाव, अमित ऊर्फ बंटी संजय गावडे (रा. सहजीवन नगर (फरार) , ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी, (रा. गुरुद्वाराचे पाठीमागे) यांचे मदतीने संजय प्रताप गुजराथी, (रा. मोहाडी उपनगर), बलजीतसिंग जलोरसिंग बराड (रा. हनुमान नगर, पाचोरा बसस्थानकाचे पाठीमागे (फरार) यांना बुलेट विक्री केल्याची माहिती दिली. या आरोपींनी बुलेट मोटरसायकली धुळे शहर, आझादनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली देवून बुलेट मोटरसायकल त्यांचेकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील आरोपी रुपेश ज्ञानेश्वर बारहाते, विपुल राजेंद्र बच्छाव , ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी , संजय प्रताप गुजराथी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT