Devendra Fadnavis Dhule visit Pudhari
धुळे

Shirpur Textile Park | मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिरपुरमधील कृष्णा कोटेक्स, डाय हाऊसचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांनी साधला इंजीनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत संवाद

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis Dhule visit

धुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कृष्णा कोटेक्स व डाय हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विले पार्ले केळवणी मंडळ संचलित इंजीनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, आमदार राघवेंद्र भदाणे, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णा कोटेक्सची पाहणी केली. जनक पटेल यांनी उद्योगाची माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिरपूर विमानतळावर आगमन झाले. राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले.

यावेळी वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, राजेश पाडवी, शिरीष कुमार नाईक, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आदी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT