पिंपळनेर : साक्री तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील टिटाणे गावाचे शिवारात आज दि.20 जानेवारी रोजी पहाटे 3 ते 3.30 वाजेच्या सुमारास सुघलॉन ग्लोबल सव्हिसेस कंपनीच्या टॉवर क्रमांक के 138मधील 1,97,000रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली. त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनी मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी आसीफ शहा, कासम शहा,वसीम जुमा शाह,आमिन करीम शहा,प्रवीण सुनिल बागले सर्व रा.जैताणे ता.साक्री जि.धुळे,घनश्याम रविंद्र अहीरराव,रविंद्र भाऊसाहेब देवरे दोन्ही रा.टिटाणे ता.साक्री यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन चोरीस गेलेला मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करताना वापरलेल्या स्कोडा कंपनीची गाडी क्र.एम एच 04 ईएफ 4590 सिल्वर रंगाची जु.वा.की.अ., मारुती इको एम एच 18 बिएक्स8261 पांठ-या रंगाची जु.वा.की.अ. असे गुन्ह्यात वापरेल्या दोन वाहनांसह एकुण 8,97,000रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई श्रीकांत धिवरे,पोलीस अधिक्षक, धुळे,किशोर काळे,अपर पोलीस अधिक्षक, धुळे, एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी साक्री, पोलिस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि मयुर भामरे,पोउनि प्रदिप सोनवणे,पोउनि मधुकर सोमासे,पोसई प्रभाकर गवळे,असई रुपसिंग वळवी, पोहेकॉ प्रशांत ठाकुर,पोहेकों नारायण माळचे,पोहेकॉ रतन मोरे,पोहेकों नागेश्वर सोनवणे, पोहेकों प्रदिप आखाडे,पोना खंडेराव पवार,पोकोंसागर थाटसिंगारे,पोकों कृष्णा भिलपोकों रामभाऊ गायकवाड,पोकों परमेश्वर चव्हाण,पोकों गौतम अहिरे, चापोहॅकॉ मनोज देवरे यांच्या पथकाने केली आहे.