Dhule Crime News
धुळे: धुळे येथील औद्योगिक वसाहती मधील एका उद्योजकाकडून दोन कोटींची खंडणीची मागणी केल्या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए गटाच्या) उपाध्यक्षाविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
धुळे येथील औद्योगिक वसाहतीत इंडो अमाईन्स लि. या नावाची कंपनी असून ही कंपनी भारतातील सर्वात मोठा फॅटी अमाईन्स तयार करणारा प्रकल्प आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल पालकर असून ते ठाणे येथील रहिवासी आहेत .कंपनीच्या प्लांट मॅनेजरकडे कंपनीच्या कामात कोणताही अडथळा न आणण्यासाठी आणि त्रास न देण्यासाठी धुळे येथील वाल्मिक दामोदर, ( उपाध्यक्ष आरपीआय (ए) गट) यांनी २ कोटी रुपयांची मागणी केली. याचा संपूर्ण पुरावा उपलब्ध झाला आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. या संदर्भात आता मोहाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. दरम्यान उद्योजकांना कोणीही त्रास देत असेल तर तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.