दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. (Pudhari File Photo)
धुळे

24-Hour Approval For Solar Projects | उद्योजकांनी सोलर पार्कसाठी प्रस्ताव दिल्यास 24 तासात मंजूरी

Atul Save Statement | दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे; दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे जिल्ह्यात येत्या काळात सोलर पार्क उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून उद्योजकांनी सोलर पार्कसाठी प्रस्ताव दिल्यास त्यास 24 तासात मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

दोंडाईचा शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ , राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, सरकारसाहेब रावल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार , कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे, अप्पर तहसिलदार संभाजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बापूसाहेब खलाणे, बबनराव चौधरी, माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मागच्या काळात धुळे जिल्ह्याला स्वजिल्ह्याचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे विविध विकास कामे पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता जिल्ह्याचा पालकमंत्री तसेच सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या महायुती सरकारचे सशक्त मंत्रीमंडळ आणि केंद्र व राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्यामुळे जिल्ह्यात अनेक विकासाची कामे होत आहे. दोंडाईचा शहरात करण्यात येत असलेल्या विकास कामासोबतच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात पुढच्या पाच वर्षांमध्ये विकास कामांची गती अधिक गतीमान होईल. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्हे हे विकासापासून मागे राहिले होते, आता या भागांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरावरील विविध खात्यांच्या मंत्र्यांमार्फत अधिक विकास कामे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सरकार साहेब रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्यात.

धुळे जिल्ह्यात सोलर पार्क उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - ना. अतुल सावे

धुळे जिल्ह्यात येत्या काळात सोलर पार्क उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून उद्योजकांनी सोलर पार्कसाठी प्रस्ताव दिल्यास त्यास 24 तासात मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

धुळे जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी सर्वतोपरी मदत करणार - ना. संजय सावकारे

जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या टेक्सटाईल कंपन्याना आपले उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दोंडाईचा येथे केले. जिल्ह्यात उद्योगांसाठी अतिशय पोषक वातावरण असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात टेक्सटाईल उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजक उत्सुक असून त्यांना शासनामार्फत सबसीडी, जमीन, पाणी, वीज व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात देवून येत्या काळात येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात टेक्सटाईल हब बनविण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, रावल कुटूंबाने नेहमीच समाज हितास प्राधान्य दिले आहे. त्यांचे आजोबा दादासाहेब रावल मुंबई प्रातांचे आमदार होते. त्याकाळी त्यांनी जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केलीत. त्यांचा विकासाचा वारसा घेऊन सरकार साहेबांनंतर जयकुमार रावल हे मतदार संघात व जिल्ह्यात अनेक विकासाची कामे करीत आहे. दोंडाईचा शहरात येणाऱ्या पिढीसाठी 26 एकरावर ऑक्सिजन पार्क, प्रशस्त रस्ते, पुल अशी कामे वाखाण्याजोगी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, विकासरत्न सरकारसाहेब रावल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

विकास कामांचे लोकार्पण आणि वृक्षारोपण

प्रारंभी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पितृछाया ऑक्सिजन पार्क येथे 11 हजार वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर अमरावती नदीवरील पर्यायी पूल (19 कोटी ), जुना शहादा रोड (जयपथ ) रोड (26 कोटी ) चे लोकार्पण संपन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT