धुळे : धुळे येथील विश्रांतीगृहात सापडलेल्या बेहिशोबी रोकड प्रकरणात न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असूनही पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. पोलिसांच्या या वागणुकीमागे सत्ताधाऱ्यांचे वरदहस्त असल्याशिवाय असे होणे शक्य नाही, असेही गोटे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सभागृहात भूमिका स्पष्ट करावी, तसेच त्यांनी दिलेले एसआयटी चौकशीचे आश्वासनही पाळले गेलेले नाही, असे सांगत गोटे यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे. "आश्वासने पेलणार नसतील, तर ती देऊच नयेत," असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.