Minor girl assault case Pudhari
धुळे

जीवे मारण्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक, शिरपूर तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर शासन आणि पोलीस प्रशासन सतर्क आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पीडितेने तिच्या नातेवाईकांना या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्यात संबंधित नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित आरोपीला अटक केली आहे.

राज्यात सर्वत्र अल्पवयीन बालिकांवर अत्याचार केल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासन आणि पोलीस प्रशासन सतर्क आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील असाच प्रकार झाल्याची बाब पुढे आली आहे. बोराडी परिसरातील एका पाड्यात राहणाऱ्या संबंधित पिडितेला अजय सत्तरसिंग पावरा याने जिवे ठार करण्याचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. विशेष म्हणजे तिच्या परिवाराला देखील ठार करण्याचा धाक दाखवल्याने संबंधित पीडिता घाबरली. याचाच फायदा घेऊन पावरा याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अखेर या पिडितेने तिच्या नातेवाईकांना ही माहिती सांगितली. त्यामुळे या नातेवाईकांनी थेट शिरपूर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली.

तक्रारीवरून पावरा याच्या विरोधात बी एम एस 2023 चे कलम 64 / 2 / एम / 351/ दोन / बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम चार व सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या गंभीरतेमुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव, सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे तसेच उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी संबंधित गावाला भेट देऊन घटनेची प्राथमिक चौकशी केली आहे. तसेच आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर ई साक्ष नोंदवण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT