उत्तर महाराष्ट्र

Dhule : आम्ही सारे सावरकरच्या घोषणा देत साक्रीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

गणेश सोनवणे

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा

तालुका भाजपच्या वतीने साक्री शहरात स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून गौरव यात्रेची रॅली काढून या यात्रेची सुरुवात केली. यावेळी 'होय आम्ही सारे सावरकर' चे बॅनर हाती घेत घोषणा देण्यात आल्या.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे मोठे योगदान आहे. सावरकर हे आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचा आदर झालाच पाहिजे. त्यांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान असल्याच्या भावना यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. सावरकर विरोधी विचारांचा निषेध केला.

या कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील व मोहन सूर्यवंशी यांनी केले. खासदार हिना गावित या देखील यावेळी उपस्थित राहिल्या. यावेळी साक्री तालुका भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी वेडू  सोनवणे, प्रदीप नांद्रे, राकेश दहिते, राकेश अहिरराव, भूषण ठाकरे, स्वप्नील भावसार, विनोद पगारिया, कुंदन देवरे, चंद्रकांत पवार, बापु गीते, शैलेंद्र आजगे, पंकज हिरे, योगेश भामरे, योगेश चौधरी, विश्वास पवार, संजय अहिरराव, मुकुंद बोरसे, रोहित पवार, उत्पन्न नांद्रे, विजय ठाकरे, जयेश नागरे पंकज, मराठे अमोल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT