उत्तर महाराष्ट्र

धुळे : मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीने आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, व्यवसायिकांसाठी महत्त्वपूर्ण काम करते. परंतु गेल्या काही दिवसांपासून महामंडळाचे कार्यालय सतत बंद असून कोणत्याही प्रकारचे कामकाज या ठिकाणी होत नाही. पुरेसे अधिकारी कर्मचारी कार्यालयांमध्ये नाहीत. मुस्लिम, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. असंख्य कर्ज प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळत नाही. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, व्यावसायिक, तरुण दररोज कार्यालयामध्ये हेलपाटे मारतात. परंतु कार्यालय सतत बंद असते. मुस्लिम समुदायातील विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक अनेक योजनांपासून वंचित आहेत. हा अल्पसंख्यांक समाजावर अन्याय असून कार्यालयातील कर्मचारी पिळवणूक करतात. असा आरोप यावेळी करण्यात आला.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळाच्या विरोधामध्ये आज अल्पसंख्याक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामंडळाच्या समोर आंदोलन करण्यात आले. मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे कार्यालय सतत उघडे ठेवावे, पुरेसे अधिकारी कर्मचारी नेमावे, मुस्लिम समाजातील विद्यार्थी, व्यापारी व उद्योजक यांना त्वरित कर्ज प्रकरण मंजूर करण्यात यावे, तसेच तरुणांना विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे, प्रलंबित फाईली त्वरीत मंजूर करावीत, मुस्लीम बचत गटांना त्वरीत अनुदानासह कर्ज मंजूर करावे. अशी मागणी यावेळेस अल्पसंख्याक आघाडी मार्फत करण्यात आली. आंदोलनचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष अमीन शेख यांनी केले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, रोशन खाटीक, नजीर शेख, फिरोज पठाण, पीर मोहम्मद शहा, एजौद्दिन शहा, बरकत शहा, तस्वर बेग, दानिश पिंजारी, अजझर पठाण, आसिफ शेख,जावेद बेग, मेहमूद रमजान, अमजीद पठाण, शोएब अन्सारी, मयूर शेख, भिका नेरकर, राजेंद्र सोलकी, राजेंद्र चितोडकर, राजेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाट, जितेंद्र पाटील, दीपक देवरे, मनोज कोळेकर, निखिल मोमाया, डॉमनिक मलबारी, रामेश्वर साबरे, भटू पाटील, गोलू नागमल, प्रणव भोसले, सरोज कदम, शकीला बक्ष, तरुणा पाटील, चेतना मोरे, सुनंदा देवरे, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT