उत्तर महाराष्ट्र

धुळे : ‘धर्मवीर’ चे मोफत तिकीट

अंजली राऊत

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यासह परिसरातील शिवसैनिक व कार्यकर्ते यांच्यासाठी पिंपळनेर येथील पी. व्ही. सिनेमा चित्रपटगृहात आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित धर्मवीर चित्रपट मोफत दाखविण्यात येत आहे. आ. मंजुळा गावित यांनी मोफत पास वाटून त्याचे उद्घाटन केले. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेला धर्मवीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी पिंपळनेरसह परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते व परिसरातील शिवप्रेमींना सलग सहा दिवस मोफत चित्रपट दाखविण्याचे नियोजन आ. गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT