उत्तर महाराष्ट्र

धुळे : अदानी, भाजपा सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य, गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला आहे. उद्योगपती अदानी यांना भारतीय स्टेट बँक आणि एलआयसीमधील पैसे उद्योगात गुंतवण्यास केंद्र सरकारने मदत केली. त्यानुसार मंगळवार, दि.7  रोजी उद्योगपती गौतम अदानी यांचा महाघोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे एलआयसी व स्टेट बँकेतील गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबा येथे धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करण्यात आले.

आंदोलनात कुसुंबा, नेर परिसरासह धुळे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्रातील भाजपा सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प अदानी समूहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. एलआयसी व एसबीआय या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये मध्यमवर्ग नोकरदार व सामान्य जनतेने गुंतवलेले कष्टाचे पैसे केंद्र सरकारने जबरदस्तीने अदानी समूहात गुंतवण्यास भाग पाडले. जनतेचा पैसा सुरक्षित रहावा व या घोटाळ्याचा पर्दाफाश व्हावा. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील एसबीआय बँकेच्या कार्यालयासमोर साधारण तासभर निदर्शने करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक प्रा. दत्ता परदेशी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे यांनी भाषणातून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला हमीभाव नाही. अशा विविध विरोधी भूमिकेमुळे केंद्र सरकारचे विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, जिल्हा सामान्य डॉ. दत्ता परदेशी, ज्येष्ठ नेते संतोष पाटील, संचालक राजेंद्र भदाणे, माजी सरपंच प्रदीप देसले, प्रा. दिलीप शिंदे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष गायत्री जयस्वाल, बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन पाटील, सेवा सोसायटीचे चेअरमन भगवान पाटील, सोमनाथ बागुल, पोपट शिंदे, संचालक कन्हैयालाल पाटील, अतुल देशमुख, कुसुंबाचे संजय शिंदे, दिगंबर परदेशी, माजी सरपंच सोमनाथ पाटील चिंचवार, माजी सरपंच धर्मराज बागुल, प्रा.डी.झेड पाटील, शामकांत शिंदे, रामभाऊ परदेशी, विष्णू रायते, अशपाक शेख, दिनेश रायते, गुलाब शिंदे, भटू नेरकर, चिंटू शेख, ऋषी शिंदे, आत्माराम कोळी,कावठीचे गुलाब शिंदे, अकलाडचे विवेक जाधव, अशोक अहिरे, उभंडचे उदय जाधव, चौगाव ग्रा.पं.सदस्य कमलाकर गर्दे, उपसरपंच हिरामण पाटील,संचालक हिंमत पाटील,  दगडू पाटील,आनंदा पाटील, महारू पाटील, जिभाऊ पाटील, दह्याणेचे प्रल्हाद मराठे, राजेंद्र पाटील, किसन पाटील, नांद्रेचे महेश पाटील, दिलीप सूर्यवंशी, खंडलायचे सरपंच आबा पगारे, चुडामण पाटील, तुषार देवरे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रायपूर अधिवेशनात तालुका पातळीवर एलआयसी कार्यालय व एसबीआय बँकांसमोर देशव्यापी आंदोलन निदर्शने करण्याचा निर्णय झाला आहे. धुळे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT