उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात 301 किलो द्राक्षांची आरास

गणेश सोनवणे

नाशिक : रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने येथील चांदीच्या गणपती मंदिरात एकादशी निमित्ताने 301 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. ही आरास आज एकादशी निमित्ताने दर्शनासाठी येणा-या भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

रविवार कारंजा म्हटले की, चांदीचा गणपती हे समीकरण ठरलेले असते. येथे 90 वर्षापासून गणपती मंदिर आहे. परंतु 1978 साली रविवार कारंजा मित्र मंडळाने या मंदिरात चांदीची मूर्ती बसवली. तेव्हापासून रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती नाशिककरांचे आकर्षण ठरु लागला. दरवर्षी गणेशोत्सवात हा गणपती पाहण्यासाठी नाशिकसह महाराष्ट्रातून गणेशभक्त येत असतात.

नेहमीच धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणा-या रविवार कारंजा मित्रमंडळाच्या वतीने शुभम खोडे व निखिल पवार यांच्या सौजन्यातून आज एकादशी निमित्ताने अतिशय मनमोहक अशी द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यासाठी त्यांना मंडळाचे अध्यक्ष नरेन्द्र पवार व कार्याध्यक्षांचे मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT