Coriander 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये कोथिंबिरीची आवक स्थिर, दरात चढउतार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कोथिंबिरीची आवक सरासरी 1760 क्विंटल झाली. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल २०० ते २६५० रुपये, तर सरासरी दर २८०० रुपये मिळाला. आवक स्थिर असून, दरामध्ये चढउतार असल्याचे दिसून आले.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक १०७१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ८०० ते १७०० असा, तर सरासरी दर १४०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १००० ते २१००, तर सरासरी दर १६०० रुपये राहिला. गाजराची आवक १२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २,५००, तर सरासरी दर २,००० रुपये राहिला.

उन्हाळ कांद्याची आवक ६,0८७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १५००, तर सरासरी दर १,१०० रुपये राहिला. लसणाची आवक ५५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,९०० ते ७,१००, तर सरासरी दर ५,७०० रुपये राहिला. बटाट्याची आवक १५२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,३०० ते २,०५० तर सरासरी दर १६०० रुपये राहिला. आद्रकची आवक ११ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ५,०००, तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ६२५, तर सरासरी ४००, वांगी ३०० ते २०००, तर सरासरी १४००, फ्लॉवर २१५ ते ५३५, सरासरी ३२० रुपये असे, तर कोबीला १२० ते २१०. तर सरासरी १६५ रुपये असे दर होते. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ६६५ ते २०००, तर सरासरी १३३५, गिलके ८३५ ते १८३५, तर सरासरी १३३५, दोडका २५०० ते ५०००, तर सरासरी दर ३७५० रुपये इतके आहेत. 

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT