उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली.

वेहेरगाव फाटा, (ता. साक्री) याठिकाणी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाईन 1098 या हेल्पलाईनवर प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश नेरकर, परिवीक्षा अधिकारी, सतिश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी समन्वय साधुन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील देवेंद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संस्थाबाहय) ज्ञानेश्वर पाटील, चाईल्ड लाईन प्रतिनिधी यांची टिम तयार करून संबंधित गावाचे पोलीस पाटील, ग्रामसेवक अमोल भामरे, सरपंच यांचेशी संपर्क साधला. निजामपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी वेहेरगाव येथील प्रकरणात तात्काळ दखल घेऊन पोलीस कॉस्टेबल रतन मोरे यांचेसोबत या कार्यालयाच्या टिमने वेहेरगाव येथे भेट देऊन कार्यवाही करण्यात आली. या गावात दोन अल्पवयीन सख्या बहिणीचे एकाच मांडवात होणारा बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळाले आहे.

दुसऱ्या प्रकरणात नागसेन नगर, देवपूर, धुळे येथे बालविवाह होत असल्याची तक्रार देवपूर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक एम. डी. निकम यांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सौ. तृप्ती पाटील, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशनचे सागर थाटसिंगार, सुनिल गवळे, रोहिदास अहिरे, एस. एस. पाटील, दिलीप वाघ, बी. वाय. नागमल, ए.व्ही. जगताप यांच्या सहकार्याने बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली. वर वधू यांना हळद लागली होती, अशास्थितीतही वर व वधू यांना हळदीच्या कपड्यांसह बाल कल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले. तिसऱ्या प्रकरणात मालपुर, ता. शिंदखेडा येथे येत्या 17 मार्च, 2023 रोजी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार माहिती प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे देवेद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संख्याबाहय) व चाईल्ड लाईनचे ज्ञानेश्वर पाटील यांनी 14 मार्च, 2023 रोजी सदर ठिकाणी पोलीस विभाग, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने सदरचा बालविवाह रोखण्यात आला. त्यांना 15 मार्च, 2023 रोजी बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले होते.

संबंधितांना बाल कल्याण समिती यांचेसमोर उपस्थित करुन मुलीच्या वडीलांकडून मुलीचे १८ वर्ष वय पुर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले. तिन्ही ठिकाणच्या बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक एम. टी निकम, धुळे व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या तत्काळ कार्यवाहीमुळे तसेच राकेश नेरकर, सतिश चव्हाण यांनी समन्वय साधुन सौ. तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन, ज्ञानेश्वर पाटील, देवपुर पोलीस ठाण्याचे आणि निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच वेहेरगाव येथील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने वेहेरगाव येथील 2, शहरातील 1 आणि मालपुर येथील 1 असे एकुण 4 अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT