धुळे; पुढारी वृत्तसेवा : केरळच्या परिस्थितीचा विपर्यास करून बनवण्यात आलेल्या सिनेमाचा प्रचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत असून ही दुर्दैवी बाब असल्याची टीका आज एम आय एम चे अध्यक्ष खासदार अससूद्दीन ओवेसी यांनी धुळ्यात केले आहे. पंतप्रधान यांनी केरळच्या विकासाची बाब जनतेसमोर मांडवी, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.
धुळे येथील आमदार फारुख शाह यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यास पक्षाचे अध्यक्ष खा अससुद्दीन ओवेसी हे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सध्या देशात गाजत असलेल्या द केरला स्टोरी या चित्रपटात संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. हा चित्रपट विपर्यास करून तयार केलेल्या माहितीच्या आधारावर तयार केलेला आहे. केरळमध्ये गरिबीचे प्रमाण कमी असून सुशिक्षित युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील 25 ते 30 टक्के विदेशी पैसा केरळच्या माध्यमातून मिळतो आहे. या राज्यातील नागरिक विदेशात नोकरीनिमित्त गेले. त्यांच्या माध्यमातून हा पैसा मिळतो, असे असताना देखील खोट्या माहितीच्या आधारावर तयार केलेल्या चित्रपटाचा प्रचार आणि प्रसार देशाचे पंतप्रधान करतात. सर्वात आधी ३२००० हरवल्याच्या नोंदणीची माहिती दिली गेली. मात्र न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर ही संख्या कमी सांगितली गेली. वास्तविक पाहता जर्मनीचे हुकूमशहा हिटलर यांनी ज्यू जनतेवर केलेल्या अत्याचारापूर्वी अशाच पद्धतीचा चित्रपट बनवल्याची आठवण होते आहे. हिटलरने 70 लाख ज्यूं ना मारण्यापूर्वी अशाच पद्धतीचा चित्रपट तयार केला असल्याचा दावा यावेळी ओवेसी यांनी केला आहे. पंतप्रधान यांनी केरळची सुंदरता तसेच या राज्यातील जनतेचे परिश्रम लोकांसमोर मांडावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते खा शरद पवार यांचे राजीनामा बाबत बोलताना ओबीसी म्हणाले की त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत तो मुद्दा असून आपण त्यावर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत याबाबत त्यांनी बोलणे टाळले.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संखेत वाढ होत आहे, याबाबत ओवेसी यांना विचारले असता त्यांनी फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना याबाबत विचारणा करायला हवी.उपमुख्यमंत्री फडणवीस लव्ह जिहाद बाबत बोलतात. मात्र बेपत्ता महिला संदर्भात बोलत नाहीत अशी टीका ओवेसी यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत आपल्यावर कायम टीका करीत असतात. याबाबत विचारले असता मोदी फक्त सतत टीका करतात काम मात्र करत नाहीत अशा शब्दात ओवेसी यांनी यावेळी मोदींवर निशाणा साधला.